रविवार, २१ जून, २०१५

वंजारी सजाजाचे सर्वमान्य संघर्षशिल नेतृत्व:बालाजी गंगाधर मुसळे

गोपिनाथरावजी मुंडे  :केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते अशी गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांची ओळख होती. मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ ला वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील आणि आईच्या प्रभावाने मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या आध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडील भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेंच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा भगवानगडावर सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. १९६९ मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, १९७८ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.

भाजप सदस्य म्हणून त्यांनी २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते. १४ मार्च १९९५ ते १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. महाराष्ट्रातून दिल्लीतील भाजपचे नेतृत्व म्हणून मुंडेंकडे पाहण्यात येत होते. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले. १९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.

भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनपाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जात होते. त्यांना भाजपमधील ग्रासरूट लेव्हलला काम करणारा नेता असे म्हटले जात असे. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होती. मुंडेंसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती.

गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा मिळालेला नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले. १२ डिसेंबर, २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता. लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले होते. या संघर्षमय पार्श्‍वभूमीमुळे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मुंबईत गेले. या बळावरच ते राष्ट्रीय नेतेपदापर्यंत पोहोचले होते. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत गोपीनाथ मुंडे यांना आपले विचार मांडायची संधी, त्यांच्या एकसष्टीच्या पूर्वसंध्येला मिळाली होती. भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला आणि केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.
--------------
पूर्ण नाव - गोपीनाथ पांडुरंग मुंडे
जन्म - 12 डिसेंबर 1949. बीड जिल्ह्यातील माथरा गावात गरीब कुटुंबात.
शिक्षण - बी. कॉम. एलएलबी.
परिवार - चार भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली.
1971 ते 1973 - आंबेजोगाई येथे कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेचे शहरमंत्र्यांची जबाबदारी.
1974 - पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या विरोधात आंदोलनात सहभाग.
1975 - औरंगाबाद येथे आणीबाणीच्या विरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व. प्रथम औरंगाबादमधील हर्सुल व नंतर नाशिक कारागृहात रवानगी. सोळा महिन्यांचा कारावास. 1977मध्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा