रविवार, २१ जून, २०१५

वंजारी समाजाचे उभारते नेतृत्व : पंकजाताई

पंकजाताई मुंडे पालवे
पंकजा (चारूदत्त ऊर्फ अमित) पालवे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी., एम.बी.ए. (३ सेमिस्टर) झाले असून त्यांना एक मुलगा आहे. पंकजा पालवे भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. पंकजा पालवे यांना वाचन व सामाजिक कार्य यांचे छंद आहेत.

राजकीय कारकिर्द:-
पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. २००९ साली झाली. त्यावेळी त्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघातून विजयी झाल्या. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचा समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा पालवे मोर्चाचे नेतृत्व केले.

पेट्रोलचे दर लीटरमागे साडेसात रुपये वाढविल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता.

परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा आमदार पंकजा पालवे सांभाळली.  भाजपच्या पंकजा पालवे यांनी मराठवाडय़ातल्या वेगवेगळय़ा प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठविला. टंचाई सदृश परिस्थितीवरून विधानसभेत झालेल्या चर्चेत गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी जलवाहिन्यांतून सौराष्टात नेण्यात आले. आपल्याकडे अशा पद्धतीने उपाय योजण्याची इच्छाशक्ती नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. चारा व पाण्याच्या अभावी मराठवाडय़ात शेतकरी जनावरे स्वस्तात विकू लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील वनक्षेत्राची पडीक, ओसाड जमीन अधिकाधिक वन लागवडीखाली यावी यासाठी खासगी संस्थांना वनक्षेत्र सात वर्षं लागवडीसाठी देण्याची योजना ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ा पर्यंत वाढवावी अशी मागणी जुलै २००७ (नं. एफएलडी.१२०२/सीआर.१६८.एफ.१०) केली . केंद्र शासनाने पाच वर्षे उलटून गेली तरी राज्य शासनाच्या पत्रावर निर्णय दिला नाही. त्यामुळे ऑक्टोबर २००९ मध्ये आमदार पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले . बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे योगेश्वरी मंदिरातील योगेश्वरीदेवीच्या मूर्तीवरील ३१ किलो सोन्याचे व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली.प्रकरणाचा छडा लावण्या करता पाठपुरावा केला.

सामाजिक कार्य:-
वैदनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले
महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन केले, त्या माध्यमातून महिलांना रोजगार व अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले
भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले
संचालक, पंडित दीनदयाळ उपाध्याय सहकारी बँक व पन्नगेश्वर सहकारी साखर कारखाना लि
ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड
परदेश प्रवास
अमेरिकी, युरोप, अरब, फ्रान्स, सिंगापूर इत्यादी देशांचा अभ्यास दौरा

परळी रेल्वेस्थानकात हैदराबाद-औरंगाबाद या प्रवासी गाडीत आसनाखाली कपडय़ात गुंडाळून ठेवलेले पाच दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे अर्भक सापडले. या घटनेची माहिती मिळताच आमदार पंकजा पालवे यांनी रुग्णालयास भेट देऊन मुलीच्या उपचार व इतर खर्चासाठी आपण दत्तक घेतल्याचे सांगून या मुलीचे भाग्यश्री असे नामकरण केले.

स्त्री-भ्रूणहत्येस आळा घालण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढावा, या दृष्टीने समाजात प्रबोधन करण्यासाठी आमदार पंकजा पालवेनी पुढाकार घेतला . स्त्री-भ्रूणहत्येस पायबंद बसण्यासाठी आमदार पंकजा पालवे यांनी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ योजनेला सुरुवात केली आहे. मराठवाडय़ात स्त्री जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी मराठवाडय़ात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना वैद्यनाथ सर्वागीण विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. मराठवाडय़ातील मंदिरांमध्ये स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जागर मोहीम राबविली 

बालाजी गंगाधर मुसळे


वंजारी सजाजाचे सर्वमान्य संघर्षशिल नेतृत्व:बालाजी गंगाधर मुसळे

गोपिनाथरावजी मुंडे  :केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते अशी गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांची ओळख होती. मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ ला वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील आणि आईच्या प्रभावाने मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या आध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडील भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेंच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा भगवानगडावर सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. १९६९ मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, १९७८ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.

भाजप सदस्य म्हणून त्यांनी २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते. १४ मार्च १९९५ ते १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. महाराष्ट्रातून दिल्लीतील भाजपचे नेतृत्व म्हणून मुंडेंकडे पाहण्यात येत होते. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले. १९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.

भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनपाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जात होते. त्यांना भाजपमधील ग्रासरूट लेव्हलला काम करणारा नेता असे म्हटले जात असे. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होती. मुंडेंसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती.

गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा मिळालेला नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले. १२ डिसेंबर, २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता. लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले होते. या संघर्षमय पार्श्‍वभूमीमुळे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मुंबईत गेले. या बळावरच ते राष्ट्रीय नेतेपदापर्यंत पोहोचले होते. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत गोपीनाथ मुंडे यांना आपले विचार मांडायची संधी, त्यांच्या एकसष्टीच्या पूर्वसंध्येला मिळाली होती. भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला आणि केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.
--------------
पूर्ण नाव - गोपीनाथ पांडुरंग मुंडे
जन्म - 12 डिसेंबर 1949. बीड जिल्ह्यातील माथरा गावात गरीब कुटुंबात.
शिक्षण - बी. कॉम. एलएलबी.
परिवार - चार भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली.
1971 ते 1973 - आंबेजोगाई येथे कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेचे शहरमंत्र्यांची जबाबदारी.
1974 - पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या विरोधात आंदोलनात सहभाग.
1975 - औरंगाबाद येथे आणीबाणीच्या विरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व. प्रथम औरंगाबादमधील हर्सुल व नंतर नाशिक कारागृहात रवानगी. सोळा महिन्यांचा कारावास. 1977मध्य

वंजारी समाजाचा इतिहास- प्रा.बालाजी गंगाधर मुसळे

वंजारी समाज
वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संखेने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. भारतात व अन्य देशांतही आढळतो. वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.

 भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज 
 वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहे 
 आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे एक मत इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.
 पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.
  हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले सैन्यासाठी दारुगोळा असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.
  आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या वंजारी समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत